Posts

Showing posts from October, 2022

गावागावांत असलेल्या मंदीराबाहेरील कोरीव दगडांचे ऐतिहासिक महत्व

Image
गावातील एखाद्या जुन्या मंदिराच्या आवारात अनेक प्रकारचे उभे दगड आढळून येतात. या दंगडांवर विविध आकृत्या कोरलेल्या असतात. एखाद्या दगडावर तीन ते चार रकाने असतात व प्रत्येक रकण्यात वेगवेगळ्या मानवी, पशूंच्या आकृत्या असतात. एखाद्या दगडावर एक हात कोरलेला असतो. एखाद्या दगडावर खाली एक गाढव एका स्त्रीशी समागम करत आहे अशी  आकृती असते व त्याच्यावर काहीतरी संदेश कोरलेला असतो. हे सगळे केवळ काहीतरी विचित्र आकृत्या कोरलेले दगड आहेत म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र हेच दगड त्या मंदिराचा, गावचा इतिहास सांगणारी साधने आहेत. त्या वेगवेगळ्या दगडांचे नेमके अर्थ काय ते आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. साधारणत: असे चार प्रकारचे दगड आढळून येतात १) वीरगळ २) सतीगळ ३) गधेगळ ४) साधूगळ १) वीरगळ (Hero Stone) गळ म्हणजे दगड आणि वीरगळ म्हणजे वीराचा दगड. एखाद्या व्यक्तिला वीरमरण आले असेल तर त्याच्या स्मरणार्थ तो कोणत्या कारणाने मरण पावला हे दाखवणारा तो दगड असतो. वीरगळाची ऊंची तीन ते साडेतीन फुट असते. ज्यावर तीन ते चार रकाने असतात. सगळ्यात खालच्या रकाण्यात तो वीर कशामुळे मरण पावला हे दाखवणारे कोरीव काम असते. त्...

श्री तुळजाभवानी मंदिराची वैशिष्ट्ये

१. तुळजाभवानी मंदिरातील छबीना एका चांदीच्या मेघ्डंबरीमध्ये देवीच्या अनेक वाहनापैकी एका वाहनावर देवीची चांदीची मुर्ती व पादुका ठेवून मंदीरा भोवती एक प्रदिक्षिणा पुर्ण करतात याला छबिना म्हणतात. श्री तुळजाभवानी मातेचा छबिना प्रत्येक मंगळवार, पौर्णिमेच्या अगोदरचा एक दिवस, पौर्णिमेचा दिवस, पौर्णिमेनंतरचा एक दिवस याप्रमाणे करण्यात येतो व फाल्गुन पौणिमेचा छबिना गुडीपाडव्याच्या दिवशी काढण्यात येतो. वर्षातील २१ निद्रा कालामधील मंगळवारी देवी शयन ग्रहामध्ये निद्रीस्त असल्यामुळे छबिना काढला जात नाही. बाकी वर्षभरात वरील प्रमाणे छबिना काढण्यात येतो. निद्रा कालावधीमध्ये स्थानिक भक्त पुजारी जोगवा मागत नाहीत. २. भेंडोळी उत्सव तुळजाभवानी मंदिर परिसरात श्री काळभैरवाचे मंदिर एका उंच डोंगरावर आहे. श्री काळभैरव हा तुळजाभवानीचे रक्षण करतो असे मानले जाते. वर्षातून एकदाच आश्विन अमावास्येला श्री काळभैरव तुळजाभवानीच्या मंदिराची व परिसराची पाहणी करण्यासाठी रात्रीच्या वेळी त्याच्या मंदिरातून बाहेर येतो असे मानले जाते. त्यासाठी प्रकाशाची आवश्यकता असते म्हणून भेंडोळी उत्सव साजरा केला जातो. भेंडोळी म्हणजे एका मोठ्या ...